spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे गटाची नावावर आणि चिन्हावर प्रतिक्रिया; उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली

उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यावरच ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना ‘पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले’, असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत की, पहिल्याच प्रयत्नात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पूर्णपणे जिंकले आहेत. याचं कारण म्हणजे आम्हाला जे नाव मिळालं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं नाव राहिलं. बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव राहिलं. आम्ही तीन जी निशाणी मागितली होती. त्यातली मशाल ही निशाणी आम्हाला मिळाली. त्यामुळे पहिल्या डावात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. म्हणून आम्ही आनंदी आहोत, असं ते म्हणाले आहेत.

नवीन नाव आणि चिन्ह याबाबत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, रविवारी शिवसेना नेत्यांची बैठक झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हेच नाव सुचवलं होत. आम्ही निवडणूक आयोगाला सुचवलेल्या चिन्हात पहिल्या क्रमांकावर त्रिशूळआणि तीन नंबरवर मशाल होती. मात्र आम्हाला त्रिशूळ मिळाली नाही, माशाला हे चिन्ह मिळालं. सुरेश भटांचा एक गाणं आहे, उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली, आता आम्ही मशाल पेटवू, असं ते म्हणाले आहेत.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांनी आपल्या चिन्हांचा आणि नावाचा पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी पक्षांच्या तीन नावाची आणि तीन चिन्हांच्या पर्यायाची नावं दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला.

हे ही वाचा:

नवे चिन्ह आणि नव्या नावावर किशोरी पेडणेकर आणि सुष्मा अंधरेंची प्रतिक्रिया

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

मोठी बातमी ! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह ‘मशाल’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss