Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray : भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर… भुजबळांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

राष्ट्रावादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आज अमृत महोत्सव सोहळा साजरा केला जात आहे. याच दरम्यान छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे.

राष्ट्रावादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आज अमृत महोत्सव सोहळा साजरा केला जात आहे. याच दरम्यान छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. याच दरम्यान अजित पवार यांनी भाषणा दरम्यान १९९९ मध्ये आणखी चार महीने वेळ मिळाला असता तर राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून सर्वाधिक जागा निवडून आल्या असत्या आणि छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असा जाहीर खुलासा केला आहे. तोच संदर्भ जोडत उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना अजित दादा तुम्ही छगन भुजबळ हे मुख्यमंत्री कधी झाले हे सांगितले, पण मी सांगतो ते शिवसेनेत असते तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते असे विधान केल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळाले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना भुजबळ यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. याशिवाय बाळासाहेब असतांना तुम्ही वाद मिटवून टाकला होता हे बरं केलं असे सांगत असताना त्यावेळी मा असायला हव्या होत्या अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. भुजबळ आणि आम्ही एकाच व्यासपीठावर बसू असे कोणी तीन वर्षापूर्वी सांगितले असते तर विश्वास ठेवला नसता पण हे आज घडत आहे असेही ठाकरे यांनी कबूल केले आहे. इतकंच काय तर छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले पण सगळी राष्ट्रवादी शिवसेनेत घेऊन आले आणि सोबत कॉँग्रेसला देखील घेऊन आले असेही ठाकरे यांनी म्हंटलंय. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आम्हाला सावरायला खूप वेळ लागला. एक चांगली गोष्ट भुजबळांनी केली ती म्हणजे बाळासाहेब असतानाच त्यांनी हे मतभेद मिटवले. त्यावेळी मॉं असत्या तर अजून चांगलं झालं असतं.”

शिवसेनेने आतापर्यंत अनेक वादळं अंगावर घेतली, मात्र आता शरद पवार आमच्यासोबत आहेत, जे वादळं निर्माण करतात असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागतं, हिंमत असेल तर मैदानात या, आम्ही तयार आहोत, होऊन जाऊ दे काय ते असं आव्हान त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिलं. शिवसेनेचा जन्मच लढण्यासाठी झाला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेना धक्काप्रुफ झाली आहे. रोज आम्हाला धक्के बसतात, पण आम्ही त्याला तोंड देतोय. मी आता मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र या मैदानात, आम्ही तयार आहोत असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिलं आहे.”

छगन भुजबळ यांच्याबद्दल जुन्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळ यांनी शिवसेना सोडताना एकटे गेले. पण नंतर महाविकास आघाडीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सोबत आणलं. एकूणच छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकरे आणि भुजबळ हा वाद बाळासाहेब असतांनाच संपला असल्याचे एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी Andheri bypoll Election ! ऋतुजा लटकेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा

Google Pixel 7, Pixel 7 Pro भारतात प्रथमच विक्रीसाठी; इथे करु शकता खरेदी

Pooja Hegde birthday : ‘किसी का भाई किसी की जान’च्या सेटवर पूजा हेगडेच्या बर्थडेचं जोरदार सिलेब्रेशन, पहा हा व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss