Devendra Fadnvis Live : उद्धव ठाकरेंनी विरोधाला विरोध करण्यासाठी आग्रह धरला, फडणवीसांचा टोला

Devendra Fadnvis Live : उद्धव ठाकरेंनी विरोधाला विरोध करण्यासाठी आग्रह धरला, फडणवीसांचा टोला

नागपूर : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बऱ्याच प्रतीक्षेनंतर पार पडला. त्यानंतर आता राज्यात खातेवाटप केव्हा होणार यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये काही खात्यांबाबत रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटप लांबत असल्याची चर्चा आहे. परंतु राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या आता खातेवाटप केल जाईल अशी शक्यता देखील मंत्र्यांकडून केली जात आहे.

खातेवाटप राखल्यामुळे विरोधकां काढून शिंदे आणि भाजप गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. खातेवाटप झाला नसल्याने राज्यातील अनेक प्रश्नांवर निर्णय प्रलंबित असल्याचाही आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्ध्यात माध्यमांशी बोलताना सांगितले, “खातेवाटप लवकरच होईल. काळजी करू नका. लवकरच तुम्हाला या बाबतची माहिती मिळेल.” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली यावर माध्यमांनी विचारे असता फडणवीस म्हणाले, बावनकुळे हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. पक्षाचे कट्टर सैनिक आहेत. त्यामुळं ते महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व देतील, ही आशा आहे. विदर्भात आमची शक्ती जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात आमचा पक्ष मोठा असून मुंबईमध्येही आम्हीच बलाढ्य आहोत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणतही पक्ष मोठा बनला आहे, असं मत फडणवीसांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील मेट्रो कारशेडबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले,”केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कांजूर मार्गाचा आग्रह धरला. आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कारशेडचे काम चार वर्षे थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील आहे आणि ते अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : 

Sanjay shirsat : आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर ?

Exit mobile version