spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वारसदार, सुप्रिया सुळे

सध्या महाराष्ट्रामध्ये रोज नवीन आरोप प्रत्यारोप पहिला मिळत. तर काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Nationalist Congress MP Supriya Sule) यांनीही भाष्य केले आहे. यावेळी बोलतांना खासदार सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे.

याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मोठं भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वारसदार असल्याचे म्हंटले आहे. शिवसेना फूटीवर सुप्रिया सुळे यांनी हे भाष्य केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत असतांना म्हंटलंय, केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेच सरकार सुडाचं राजकारण करतंय.

आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचं राजकारण कधी केलं नाही, सत्तेत आल्यावर कधी करणार नाही, विरोधात असेल तर पक्षात प्रवेश केला की माफ असं सुरू आहे. सुरू असलेलं सुडाचं राजकारण वाईट आहे, उद्वव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वडिलांचे पक्ष उभा करण्यात कष्ट आहेत, उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंच नावं ठरलं होतं.

Latest Posts

Don't Miss