Uddhav Thackeray Live, उत्तर भारतीय नागरिकांसोबत ठाकरेंचा संवाद, मी भाजपला सोडलं, हिंदुत्व…

आज दि १९ फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर भारतीयांसोबत संवाद साधला आहे. यावेळेस त्यांनी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

Uddhav Thackeray Live, उत्तर भारतीय नागरिकांसोबत ठाकरेंचा संवाद, मी भाजपला सोडलं, हिंदुत्व…

आज दि १९ फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर भारतीयांसोबत संवाद साधला आहे. यावेळेस त्यांनी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा डिवचलं आहे. त्यांनी धनुष्य चोरल पण प्रभू राम आमच्या सोबत आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधला आणि त्यावेळेस ते म्हणाले, लादाहयचे असेल तर मैदानात या जनता तुम्हाला उत्तर देईल. भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदुत्व नाहीय. मी भाजपला सोडलं, हिंदुत्व ला सोडलं नाहीय. हिंदूंच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे. आणि आता हिंदू अडचणीत आहेत असं हे लोक म्हणतात असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सर्व हिंदू लोकांना मूर्ख बनवलं जात आहे. पुढे उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना लक्ष्य केंद्रित केले आहे. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, ”हे मोगॅम्बो आहेत. तुम्ही मिस्टर इंडिया चित्रपट आठवला तर त्यात मोगॅम्बोला हेच हवे होते. देशात आपापसात लढाई व्हावी. लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत. हिंदू असाल तरी लढा, आमच्यासोबत जे आहेत, तेच आमचे. हिंदू असो की कोणी दुसरा, त्याने फरक पडत नाही. तुम्ही आमच्या पक्षात आले तर, तरच तुम्ही हिंदू. नाही तर तुम्ही हिंदुत्व सोडलं.”

ती ५६ इंचाची छाती तेव्हा कुठं गेली होती असा देखील खोचक सवाल यावेळेस उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज सांगिल्या गोष्टी या बुद्धिबळाच्या जोरावर चालू आहेत. जे आमच्यासोबत झालं तेच इतर पक्षासोबतही होऊ शकत असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, बाळासाहेबांनी गुलामगिरी करायला सांगितली नाही. वडिलांनी ज्यांना मोठं केलं त्यांनाच आता मालक व्हायचं आहे. आता मुंबईला दासी बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा देखील खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. कोस्टल रोड देखील पालिकेच्या एफडी मधून बनवला जात आहे. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पुढे महाविकास आघाडीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ”मी काँग्रेससोबत गेलो नाही, तर भारतीय जनता पार्टीने मला ढकललं आहे. मला हे यासाठी सांगायचं आहे की, तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये. २०१४ मध्ये मी युती तोडली नव्हती. भाजपने युती तोडली होती. तेव्हाही मी हिंदू होतो, आजही मी हिंदू आहे.

हे ही वाचा : 

Somvati Amavasya 2023, वर्षातील पहिली सोमवती अमावस्या, जाणून घ्या मुहूर्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version