spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray live | माशाच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत : उद्धव ठाकरे

ध्याच्या राजकीय स्थितीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

मुंबई : सध्याच्या राजकीय स्थितीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकाशस्त्र सोडले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“शिवसेना कोणती गोष्ट नाही की कोणीही चोरून पळून घेऊन जाईल. नव्या चिन्हाचा विचार करणे गरजेचे नाही. धनुष्य शिवसेनेकडे राहील. विधिमंडळ पक्ष किंवा रस्त्यावरचा पक्ष हा जनतेचा न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरतो. मग हे लोकप्रिनिधी अशा पक्षाच्या माध्यमातुन निवडून जातात. एकदा आमदार पक्ष सोडून गेला तर तो पक्ष संपत का ? आणि जरी सगळे आमदार गेले तरीही पक्ष संपत नाही. आमदार जाऊ शकतो पण पक्ष जाऊ शकत नाही. असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

” हा संभ्रम निर्माण केला जात आहे. मी सगळ्यांना सांगतोय या की तुम्ही त्यांच्या संभ्रमात पडू नका. आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

पक्षाच्या चिन्हाबाबत संजय राऊत यांची भूमिका

बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे म्हणाले, ” जी गोष्ट अडीच वर्षांमध्ये करायला पाहिजे होती, ती तुम्ही केली नाहीत. जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती तुम्ही घातपाताने केली. तुम्ही सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा तुमची सुरत इथेच दाखवून बोलला असतात तर मला चालले असते. ज्यांनी ठाकरे कुटुंबावर टीका केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. सध्या माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा मनातील भावना मोकळा करणे गरजेचे आहे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाणे व नवी मुंबई नंतर कल्याण-डोंबिवलीचे माजी नगरसेवक आता शिंदे गटात सहभागी

Latest Posts

Don't Miss