spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“कोणीच स्वत:ला देवापेक्षा मोठं मानू नये” ; बांग्लादेश प्रकरणावरून Uddhav Thackeray यांचा खडाजंगी टोला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दौरे चालू आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे याच पार्श्वभूमीवर सध्या ते दिल्ली दौऱ्यावर आहेत. येथून ते आज (७ऑगस्ट) पत्रकारपरिषदेत सध्य घटनांवर त्यांनी भाष्य केले आहे. बांग्लादेशमधील स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली. अमित शाह आणि पीएम मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत ते बांग्लादेशला जाणार असेल तर त्यांनी जावं आणि ज्या पद्धतीने रशिया- युक्रेन युद्ध थांबवलं म्हणत होते, त्या पद्धतीने बांग्लादेश युद्ध सुद्धा थांबवावे अशी टिप्पणी केली. बांग्लादेशमध्ये आज जे काही घडत आहे ती सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की “आज पाकिस्तान बांग्लादेश श्रीलंकेमध्ये जी स्थिती झाली आहे यावरून एकच लक्षात येते की जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. इस्त्रायलमध्येही हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधानांना घरातून बाहेर पडणं अशक्य झालं होतं. ते पुढे म्हणाले की अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये. बांग्लादेशमध्ये आज जे काही घडलं आहे तो इशारा आपल्या सर्वांसाठी असून जनतेचे न्यायालय सर्वोच्च असल्याचे ठाकरे म्हणाले. कोणीच स्वत:ला देवापेक्षा मोठं मानू नये, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला. मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत देवानेच मला पाठवल्याचे वक्तव्य केले होते.”

“दरम्यान, बांग्लादेशमधून परागंदा होण्याची वेळ आल्यानंतर बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये आश्रयासाठी आल्या आहेत. शेख हसीना यांना भारत सरकारकडून संरक्षण देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज शेख हसीना यांना संरक्षण देणार असाल, तर बांग्लादेशमधील हिंदूंचे सुद्धा रक्षण करावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.”

हे ही वाचा:

आधी पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि आता बांग्लादेश ; चीनची धूर्त नीती भारतावर डाव साधण्याच्या प्रयत्नात?

Uddhav Thackeray यांचा आज दिल्लीदौरा होणार सुरु; दरम्यान भेटणार ‘या’ महत्वाच्या नेत्यांना

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss