spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसैनिकांनो नव्या पक्ष चिन्हासाठी तयार रहा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

पक्षाच्या चिन्हावर आता प्रश्न चिन्हं? उध्दव ठाकरेंचे पदाधिकऱ्यांना आवाहन

मुंबई: गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात जे सत्तानाट्य घडले. ते कुणीच विसरू शकणार नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाविकास आघाडीला अल्पमतात आणले. उद्धव ठाकरें यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. लगेच एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नवीन सरकार स्थापन केले. शिवसेनेला सध्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे पुन्हा पक्ष बांधणी आणि वाढणीसाठी उपलब्ध झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात आता शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत मोठं प्रश्न ‘चिन्हं’ उभं राहिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना नवीन आवाहन केल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या बाबतीत महत्वाची भूमिका मांडल्याचे समोर येतेय. त्यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे. उध्दव ठाकरेंनी याबाबत काय म्हंटले आहे ते आपण पाहणार आहोत. उध्दव ठाकरे म्हणतात, शिवसैनिकांनो शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न होईल. नव्या चिन्हाची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. जो काही लढा द्यायचा आहे तो आपण कायद्याने देऊ. परंतू कायदेशीर लढाईत अपयश आल्यास तशी तयारी ठेवा. शिवसेनेला जे नवे चिन्ह मिळेल ते कमी कालावधीत घरोघरी पोहचवण्याची जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो. शिंदे गट आणि भाजप दोघे एकत्र येऊन शिवसेनेला संपवण्याचा कट करत आहेत. असा थेट आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच शिंदे गटाच्या प्रयत्नांना न्यायालयात ही पाठींबा मिळतोय. आता माझी प्रकृती ठीक आहे, दर दिवसाआड मी सेना भवनात तुमच्यासाठी उपलब्ध असेन. विरोधकांशी दोन हात करण्यास आपण सज्ज असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांवर खासदारांचा दबाव वाढू लागला आहे. राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी ठाकरेंना पत्र लिहीत राषट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. द्रौपदी मुर्मूना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहेत. त्यामुळे या उद्धव ठाकरेंवर दबाव वाढल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे येत्या काही दिवसात काय काय घडणार हे पहावं लागेल.
https://youtu.be/uI_Hlv3CHcs

Latest Posts

Don't Miss