उद्धव ठाकरेंनी केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली सामनाच्या मुलाखतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरेंनी केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली सामनाच्या मुलाखतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. २६ जुलै रोजी आवाज कुणाचा या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे तर नुकतेच झालेले राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे. “अजित पवार हे प्रमाणिकपणे काम करतात. त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्या खात्यामध्ये चांगले काम केले आहे. त्यामुळे सध्या गद्दारांच्या सरकारमध्ये अजित पवरांकडून चांगले काम होईल का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. याबाबतीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात. ज्यांना आपण आपलं मानतो तीच बांडगुळ निघतात. त्यामुळे जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोचं आहेत. तर शिवसेना हे नाव पुन्हा मिळेल, असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदाव्यांचं सत्र सुरु आहे. तर ठाकरेंच्या मुलाखतीवर सत्ताधारी पक्षांकडूनही जोरदार टीका होत आहे.

राज्यामधील राजकीय उलथापलथीनंतर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्याचबरोबर अजित पवारांसह आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये बंडखोरी झाली. शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी शिवसेना पक्षावर दावा केला. तसचं अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या बाबतीत केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाणा आलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणामध्ये कोणती नवी समीकरणे तयार होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

अश्विनने या खेळाडूला मागे टाकत केला नवीन विक्रम

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध , आंदोलन

गणपती स्पेशल रेसिपी: घरीच बनवा बाप्पासाठी मोदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version