दादरमधील वादानंतर उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचे कौतुक

गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मध्यरात्री दोन्ही गटात हाणामारी झाली.

दादरमधील वादानंतर उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचे कौतुक

गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मध्यरात्री दोन्ही गटात हाणामारी झाली. पहाटेपर्यंत दादर पोलीस स्टेशनबाहेर तणावाची स्थिती होती. पोलिसांनी शिंदे गटाच्या तक्रारीनंतर महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना अटक केली. त्यानंतर आज सकाळपासून शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी दादर पोलीस स्टेशनबाहेर जमू लागले. शिंदे गटाविरोधात आणि गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात का आला नाही, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केला. यावेळी दादर पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी देखील झाली आहे. यासर्व प्रकारानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांचे कौतुक करण्यात आले आहे.

या सर्व प्रकारानंतर सर्व शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यादरम्यान उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक केलं. आणि सर्वाना कौतुकाची थाप दिली देखील दिली आहे. तर या सर्व प्रकरणी आमच्यावर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ, अशी प्रतिक्रिया या वेळी महेश सावंत यांनी दिली. तसेच यावेळी महेश सावंतसह इतरही ५ शिवसैनिकांवर कौतुकाची थाप उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

नेमके प्रकरणं काय ?

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना हे वाद सुरु आहेत. पण आता हे वाद हळू हळू वाढू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मुंबईतील प्रभादेवीत गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर काल पुन्हा एकदा मोठा वाद झाला आहे. या दोन्ही गटात जोरदार हाणामारी देखील झाली. दरम्यान आता हा वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेतील कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर आज दादर पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. सदा सरवणकर यांच्या विरोधात त्याठिकाणी घोषणा बाजी करण्यात आली. या सर्व वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनमध्ये अरविंद सावंत यांनी उपस्थिती दर्शवली तसेच किशोरी पेढणेकर आणि अनिल परब देखील दादर पोलीस स्टेशन मध्ये पोहचले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. यावेळी शिवसेने नेते अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.

हे ही वाचा :

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न, सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

शिवसेना व शिंदे गटातील वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनबाहेर राडा

मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेचे अरविंद सावंत यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version