शेतकऱ्यांनी मांडल्या उद्धव ठाकरेंकडे व्यथा

सध्या राज्यासह शिर्डी मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस नसल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह चारा, विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सर्व पिके वाळून चालली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी मांडल्या उद्धव ठाकरेंकडे व्यथा

सध्या राज्यासह शिर्डी मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस नसल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह चारा, विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सर्व पिके वाळून चालली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याच दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून येत्या शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सध्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, पुणतांबा या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी काकडी गावातील शेतकऱ्यांशी संवादही साधला. शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यंदा पाऊसही कमी असल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

शेतकऱ्यांनी म्हटलं, १८२ गावांमध्ये कुठेच पाणी नाही. सायाबीनचं पिक पूर्णपणे करपून गेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकारनं असताना इथल्या गावांसाठी १,००० कोटींचा निधी मिळाला होता. पण त्यानंतर काहाही मिळालेलं नाही. मजूरांना कामं नाहीत, जॉईन्ट खातं असल्यामुळं सरकारी मदतीचा काहीही फायदा मिळत नाही. त्याचबरोबर पिण्यासाठी देखील आम्हाला पाणी विकत घ्यावं लागत आहे. जनावरांना चाऱ्यासाठी ऊसही नाही, खाटिकही जनावरांना घेत नाही. गावात प्यायलाही पाणी नाही. तसेच काकडी गावातील काही महिलांनी देखील ठाकरेंना इथल्या समस्या सांगितल्या. त्यांनी सांगितलं की, आमच्या गावात विमानतळ झालं. हे विमानतळ येणार असल्यानं आम्हाला खूप आश्वासनं दिली गेली, त्यासाठी १५०० एकर जमीन कवडीमोल भावात घेतल्या. आमच्या गावात प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाही. आम्हाला जर तातडीनं कर मिळाला तर आम्ही गावात शाळा, लाईटची व्यवस्था करु शकतो. आम्ही मंत्रालयात जाऊन सर्व मंत्र्यांना निवेदनं दिली आहेत.

यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले कि, ३० कोटी रुपये खर्चुन आमच्या गावात ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम केला गेला. आणि आमच्याच जमिनीवर उभं राहून कार्यक्रम केला पण आमची भेटही घेतली नाही, असा आरोपही यावेळी या महिलांनी केला. यावर विरोधीपक्ष नेते अंबादास विधीमंडळात आवाज उठवतील तसेच आपण रस्त्यावर आवाज उठवू यात मी स्वतः लक्ष घालेन असा दिलासा उद्धव ठाकरेंनी त्यांना दिला. यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारी कर्मचाऱ्यांना काही सूचनावजा सवालही केले. पिक विम्याचे गेल्यावर्षीचे २४ कोटी रुपये काही जणांना मिळाले काहींना मिळाले नाही, याबाबत त्यांनी या कर्मचाऱ्यांकडं विचारणा केली. तसेच लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडवायला हवा अशी अपेक्षा त्यांनी या कर्मचाऱ्यांकडं व्यक्त केली. दरम्यान, या परिसरात आपण पुन्हा दौरा करणार असून तोपर्यंत कोणीही धीर सोडू नये, अशा शब्दांत ठाकरेंनी इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा: 

 राज्यभरात सर्व जिह्ल्यात पावसाची दमदार हजेरी

उद्धव ठाकरे यांचा अहमदनगर येथे दुष्काळ दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version