दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार आणि तो शिवसेनेचाच होणार ; उद्धव ठाकरे

दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार आणि तो शिवसेनेचाच होणार ; उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे व आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यानंतर शिवसेना पक्षाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्याने भरारी घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मातोश्रीवर शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी सवांद साधला आहे. या पत्रकार परिषदेत यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या उद्धव कदम यांनी ठाकरेंची भेट घेतली. “मातोश्री हे हिंदुत्वाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मंदिराचा गाभारा आहे. त्याचं महत्व आणि महात्म्य टिकून राहिलं पाहिजे. कारण मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल आणि महाराष्ट्र टिकला तर महाराष्ट्राचं अस्मिता टिकेल.” असे उद्धव कदम यांनी म्हटले.

हेही वाचा : 

आज कोल्हापुरात ‘गोकुळ’ची सभा गाजणार; विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने

दसरा मेळाव्या विषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”कोणाला किती संभ्रम निर्माण करायचा तो करू देत पण, दरवर्षी प्रमाणे दसरा मेळावा हा शिवाजी पार्कमध्ये होणार आणि शिवसेनेचाच होणार.” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Exit mobile version