Saturday, July 6, 2024

Latest Posts

‘लाडकी बहीण’ योजनेवर उद्धव ठाकरे म्हणाले,’मुलांचाही विचार करा, तरुण बेरोजगार…

महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने शुक्रवारी (२७ जून) अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना जाहीर केली. यानंतर यावरून राजकारणही सुरू झाले आहे.

Uddhav Thackeray On Maharashtra Budget : महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने शुक्रवारी (२७ जून) अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. यानंतर यावरून राजकारणही सुरू झाले आहे. या योजनेला प्रतिसाद देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लाबोल करताना त्यांनी अर्थसंकल्प केवळ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेले दिसत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुम्हाला आज मिळाली, पण तुम्ही आमच्या मुलांचाही विचार करा. राज्यात आज अनेक तरुण बेरोजगार आहेत, राज्याच्या विकासासाठी आणि रोजगाराच्या कोणत्याही योजना नाहीत. अर्थसंकल्प केवळ आगामी निवडणुकांसाठी आहे, ‘अच्छे दिन’ कुठे आहेत, हे सर्व विधान आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. २१ ते ६० वयोगटातील महिलांना हा भत्ता दिला जाईल. विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणात माहिती देताना पवार म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (माझी लाडकी बहीण) योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, “राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या ४ महिने अगोदर त्याची अंमलबजावणी केली जात आहे.” या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद ४६,००० कोटी रुपये असेल. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ जाहीर केली आहे. या कल्याणकारी योजनेअंतर्गत, ५ सदस्यांच्या पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील. याशिवाय राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss