Sunday, July 7, 2024

Latest Posts

हे Mahayuti नाही महागळती सरकार, Uddhav Thackeray यांची जोरदार टीका

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद (Uddhav Thackeray Press Conference) घेत, "या सरकारच निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय म्हणत आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.

आजपासून (गुरुवार, २७ जून) महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2024) सुरु झाले आहे. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये भेट झाली. यामुळे, राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अश्यातच, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद (Uddhav Thackeray Press Conference) घेत, “या सरकारच निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय म्हणत आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “या सरकारच निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय म्हणत आहे. या अधिवेशनात सरकार कडून घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जो घोषणांचा पाऊस होईल तो गाजर संकल्प असेल. कारण निधी खर्चच होणार नाही. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ होत आहे. सरकारला जरातरी संवेदना असतील तर घोषणांची अंमलबजावणी किती झाली हे सांगावे. केंद्र आणि राज्यातील यांची दोन्ही सरकारे महायुती सरकार नसून महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. कारण राम मंदिरसुद्धा लीक होत आहे आणि पेपर सुद्धा लीक होत आहेत. काही विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट आमच्यावर आरोप करतात.”

ते पुढे म्हणाले, “फक्त अमरावती जिल्ह्यात रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. मुख्यमंत्री म्हणाले होते यापुढे राज्यात एकही शेतकरी जीव देणार नाही. मुख्यमंत्री यांची शेती पंचतारांकित आहे. देशात आणि राज्यात असा शेतकरी नाही. ते आपल्या शेतात हेलिकॉप्टरने जातात. आता शेतकऱ्यांच्या कोणी वाली राहिला नाही. पिकविम्याचा निधी शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. १ रुपये पिकविम्याची घोषणा केली होती पण अद्याप त्याचा लाभ नाही. दुर्दैवी एनडीए चे सरकार पुन्हा आले आहे. या डबल इंजिनच्या सरकारने पीक कर्ज माफ करुन दाखवावे. तुम्हीपण निवडणुकीच्या पाहिले माफ करा. मी पिक कर्ज माफ केले होते. त्यांनी जाहीर केलेलं आकडे कागदावर आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्याला काही मिळालं नाही. १० हजार २२ कोटी नुकसानभरपाई दिलेली नाही. १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेपटावर निभावलं आणि केंद्रात त्यांचं सरकार आलं. त्यांच्या भाषेत महाशक्तीचे सरकार आलं आहे. आमची जाहीर मागणी आहे की तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करा आणि निवडणुकीला या. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आमचं सरकार होतं तेव्हा फडणवीस यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली.ती अजून पूर्ण झालेली नाही,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले,” मध्य प्रदेश सरकार सारखी लाडली बेहना योजना महाराष्ट्रात आणणार आहेत. हे सरकार लाडकी बहीण ही योजना आणताहेत. मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका.लाडका मुलगा अशी देखील योजना आणा. राज्यात एवढी गंभीर परिस्थिती झाली आहे. डबल इंजिन सरकारने माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा. लाडकी बहीण आणा आमचा पाठिंबा आहार पण सोबत लाडका मुलगा ही देखील योजना आणा,” असे ते यावेळी म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस आणि मी एका लिफ्टने प्रवास केला. तिथे कोणी नव्हतं. ते एक गाणं आहे ना…नाना करते प्यार….याचा नाना पटोले यांच्याशी काही संबंध नाही. ‘नाना करते प्यार हम कर बैठे…’ असं काही नाही. भिंतीला कान असतात असं म्हणतात पण लिफ्टला कान नसतात.आता गुप्त भेटीसाठी लिफ्ट चांगलं ठिकाण आहे. गाजर अर्थसंकल्प असणार आहे. याआधीच्या बजेटमध्ये किती काम केलं याची उद्या श्वेतपत्रिका काढावी. मला विश्वास आहे की ही श्वेतपत्रिका कोरी असेल. विधान परिषदेची निवडणूक आम्ही लढवणार. राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांचा उमेदवार देईल. काँग्रेस त्यांचा उमेदवार देईल. आम्ही आमचा उमेदवार देऊ. आमची मतं ठाम आहे.वरची मत कशी मिळवायची हे आम्ही बघू.ते आम्ही जाहीर सांगणार नाही. त्यांची मतं त्यांनी सांभाळावी.कारण लोकसभा निवडणुकीनंतर बरंच काही बदललं आहे. पेढा गुप्तपणाने कोण भरवणार हे तुम्हाला कळेल.”

हे ही वाचा:

Atul Bhatkhalkar यांनी सांगितले ३ मिनिटांच्या भेटीचे गमक

‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss