spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Modi हे भेकड जनता पक्षाचे नेते, Uddhav Thackeray यांचा हल्लाबोल

नरेंद्र मोदी हे भेकड पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यावर पंतप्रधान नाही तर एक व्यक्ती म्हणून कायम टीका करत राहणार, असे व्यक्तव्य शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

‘नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भेकड पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यावर पंतप्रधान नाही तर एक व्यक्ती म्हणून कायम टीका करत राहणार,’ असे व्यक्तव्य शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) आज (मंगळवार, ९ एप्रिल) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा ४८ जागांचा फॉर्म्युला ठरविण्यात आला.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे उपस्थित होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “काल तीन गोष्टींचा एकत्रित योग्य होता. अमावास्यां होती, ग्रहण होत, आणि यांची सभा होती.. काल जे भाषण झालं ते पंतप्रधान यांचं भाषण नव्हतं तर भेकड जनता पक्षाचे नेते मोदी यांचे भाषण होते. भाजपमध्ये ताकद नाही म्हणून त्यांना भेकड बोलतो.” “भ्रष्ट तितुका मेळावा, भाजप पक्ष वाढवावा’ असा भाजप पक्ष झाला आहे. जेव्हा शिवसेना निर्माण झाली, तेव्हा मोदी हिमालयात असतील. त्यामुळे, महाराष्ट्रातील लोकांना खरी शिवसेना माहित आहे. त्यांनी त्यांच्याजवळ चायनीज माल ठेवावा.” “भाजप पक्ष खंडणीखोर झाला असून खंडणीखोर नेत्यांनी असे शिवसेनेला हिणवणे योग्य नाही.” असे ते म्हणाले.

मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्यानुसार महाविकास आघाडी ४८ जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना उबाठा पक्षाला २१ जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेस १७ जागांवरून लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष १० जागांवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बहुचर्चित सांगली आणि भिवंडी मतदारसंघामधील जागेवरून झालेला तिढा संपला असून सांगली मतदारसंघातून शिवसेना उबाठा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर, भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढणार आहेत. मुंबईतील सहा मतदारसंघापैकी मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर या जागांवरून काँग्रेस लढणार असून उर्वरित चार जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss