हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही – उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही – उद्धव ठाकरे

काल महाराष्ट्रच्या राजकारणात सत्ता पालट झाल्याचे पहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी एकनाथ शिंदे यांना शुभेछा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांना ट्विटर द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील शिंदे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मुंबईतील मेट्रो कारशेडचा ठाकरे सरकारचा निर्णय बदलून तो पुन्हा आरेमध्ये करण्याला मान्यता देण्यात आली. या बदललेल्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज पहिल्यांदा तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे. माझ्यावर राग आहे ना तर माझ्यावर राग काढा, माझ्या पाठीत वार करा. माझा राग मुंबईवरती काढू नका. नव्या सरकारनं आरेचा जो निर्णय बदलला त्याचं मला खरोखर दुःख झालेलं आहे. आरे हा कोणाचा खासगी प्लॉट नाही. तिकडे कुठल्याही बिल्डरला आपण आंदन दिलेलं नाही. पर्यावरणासाठी आवश्यक असलेली वनराई होती, त्यावर एका रात्रीत झाडांची कत्तल झाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आरे कारशेडला स्थगिती दिली. मी कांजूरमार्गचा पर्याय दिला होता. मी पर्यावरणाच्या सोबत होतो. त्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे, की माझ्यावरचा राग मुंबईवरती काढू नका.

त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला बाजूला करून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं ही यावेळी म्हटलं आहे. अमित शहांनी माझा शब्द पाळला असता तर अडीच वर्ष भाजप चा ही मुख्यमंत्री झाला असता. माझ्या पाठीत वार करून तथाकथित शिवसेनेचा मुख्यमंत्री तुम्ही बनवला. असं ही उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version