spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटनात उद्धव ठाकरेंनी साधला सत्ताधारी पक्षांवर निशाणा

जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर खोक्यावरून निशाणा साधला आहे. खोके देऊन लोकं आपल्याकडे आणली जात असतील आणि खोक्यांचं राजकारण करायचं असेल तर लोकशाही संपली असं जाहीर करा असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर खोचक शब्दांत तोंडसुख घेतलं आहे.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये होत नाही. आता आपल्याकडे गुप्त मतदान आहे. मात्र नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहित आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून-कुठ्न जाणार आहे. ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गुप्त होऊ लागले आहेत. असे कसे चालणार. अशी लोकशाही आपण मानणार नाही. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ असा लावणार असेल तर देशातील लोकशाही संपली असे एकदा जाहीर करून टाका. तुम्ही कोणालाही मतदान केले तर त्याला आम्ही खोक्यात बसून आमच्याकडे घेऊन टाकू अशी परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. “पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “उद्या मोदी येतायत समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायला. उद्या ते राज्यपालांच्या सगळ्या वक्तव्यांवर पांघरूण घालायचा प्रयत्न करतील की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते वगैरे. बाळासाहेब कसे होते वगैरे बोलून आम्हाला टोमणे मारतील. कारण त्या महामार्गाचं नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्यावर कदाचित ते बोलतील. माझी त्यांना विनंती आहे. बोला, तुमचा अधिकार आहे. पंतप्रधान म्हणून तुम्ही देशाचे पालक आहात. पालकासारखं बोला. पण महाराष्ट्र म्हणजे पालकाची भाजी आहे असं बोलू नका. कुणीही यावं आणि आमची भाजी करावी एवढे आम्ही काही मिंधे नाही आहोत. जे होते, ते मिंधे तिकडे गेले”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावरही खोचक टीका केली.

हे ही वाचा : 

वसंत मोरेंनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट, पक्ष सोडण्याच्या चर्चेवर पूर्णविराम

Sulochana Chavan passes away जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

Ashok Kumar : ‘दादामुनी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार यांची आज पुण्यतिथी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss