spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray Live ‘मी कर्नाटकच्या मंत्र्यांना धन्यवाद देतो…’ उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना चिमटा

कर्नाटकचे भाजपचे (BJP) मंत्री सी एन अश्वत्थ नारायण यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘भाजपच्या पोटातलं भाजपच्या नेत्याच्या ओठावर आलंय. कर्नाटकातल्या मंत्र्यानेच जगासमोर आणलंय. बोम्मई ज्या हिंमतीने आणि धाडसाने बोलत आहेत. तसे आपले मुख्यमंत्री बोलत नाहीयेत. २००८ मध्ये कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवा असं सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करता येणार नाही. मात्र कर्नाटक ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेत आहे. बेळगावचं नामांतर, विधानसभवन, उपराजधानी केली, मराठी भाषिक अत्याचार सुरु केले. त्याला काहीही उत्तर दिलं नाही. त्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, या भूमिकेचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुनरुच्चार केला.

हेही वाचा : 

Pune Covid News पुणेकरांनो सावधान! सिंगापूरहून आलेला प्रवासी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या एका जुन्या वक्तव्यावरून टोलेबाजी केली. ते म्हणाले, “दीड महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जशी निवडणूक जवळ येईल तसे शिवसेनेकडून पुन्हा मुंबई तोडण्याचा डाव असा अपप्रचार सुरु होईल. आता भाजपाच्या पोटातलं भाजपच्याच (कर्नाटकाच्या) मंत्र्यांच्या ओठावर आलं. मुंबई तोडण्याचा आणि मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव भारतीय जनता पक्षातल्या पोटात आहे. तो त्यांच्याच मंत्र्याने जगासमोर आणला.

उद्धव ठाकरे शिंदेंना काय म्हणाले?

“मिंदे गट काल शिवसेना कार्यालयात गेले होते. आज आरएसएस कार्यालयात गेले. आरएसएस कार्यालयात देखील तिथेही ते ताबा सांगायला गेले होते का? सध्या दुसऱ्यांचे मंत्री, पक्ष आणि कार्यालय चोरण्याचा महाराष्ट्रात प्रकार सुरू आहे. हा प्रकार पाहून महाराष्ट्रात टोळीचे राज्य आले का अशी भावना जनमानसात आहे. शिंदेची वृत्ती घाणेरडी असून आरएसएसने काळजी घ्यावी. भागवतांनी देखील कार्यालयात कुठे लिंबू टाकलं का पाहावे, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) टोला दिला आहे.

Hindu Woman Beheaded In Pakistan पाकिस्तानमध्ये ४० वर्षीय हिंदू महिलेची निर्घृण हत्या, डोके आणि कातडीची कापली

हिवाळी अधिवेशन असूनही सत्ताधार्‍यांना विरोधकांनी घाम फोडला. मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपातील गांभीर्य पाहता मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवे. आरोप झाल्यावर ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना क्लिनचिट द्यायची अशी काही योजना आहे का? असा प्रश्नांचा भडिमार उद्धव ठाकरेंना केला

Latest Posts

Don't Miss