spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर

आजचा दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी महत्वाचा ठरणार आहे. परतीच्या पावसाने मराठवाड्यात शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले असून, याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचं बंड आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिला दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

काही दिवसांपासून सुरूअसलेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पीक मातीमोल झाली आहे. दिवाळी सारखा सण सुद्धा शेतकरी साजरा करू शकत नसल्याची परिस्थिती आहेत. अशात बळीराजाला मदतीची आणि धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज औरंगाबादचा दौरा करत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच त्यांच्या व्यथा देखील जाणून घेणार आहे. गंगापूर तालुक्यातील दहेगाव, पेंढापूर या दोन गावातील नुकसानीची ठाकरे पाहणी करतील.

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दुपारी १२.१५ वा. औरंगाबाद विमानतळाहुन दहेगाव ता. गंगापुर कडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी ०१.०० वा. दहेगाव ता. गंगापुर येथे आगमन व दहेगाव शिवार येथे पीक नुकसानीची पाहणी करणार आहेत. दुपारी ०१.१५ वा. पेंढापूर ता. गंगापुरकडे पुढचा प्रवास सुरु करतील. दुपारी ०१.३० वा. पेंढापूर ता. गंगापुर येथे आगमन व पीक नुकसानीची पाहणी करणारा आहेत. तर दुपारी ०१.४५ वा. पत्रकारांशी संवाद साधणार. दुपारी ०२.४५ वा. चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद प्रयाण करतील. अनेक भागात अजूनही सरकारी यंत्रणा पोहचली नाही. तर बहुतांश भागात पंचनामे देखील झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच महसुल विभागातील अनेक कर्मचारी कागदोपत्री नुकसान पाहणी करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे याच फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा :

राशी भविष्य – २३ ऑक्टोबर २०२२ – आजचा दिवस मंगलमय वातावरणात…

मधुमेहाच्या रुग्णांसाठी घरीच तयार करा शुगर फ्री लाडू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss