Uddhav Thackeray Vs Eknath Shinde , अनिल देसाईंनी केला मोठा गौप्यस्फोट, सत्तासंघर्षावरील निकाल…

काल दि २२ फेब्रुवारी पासून सलग ३ दिवस पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी ही सुरु झाली आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde , अनिल देसाईंनी केला मोठा गौप्यस्फोट, सत्तासंघर्षावरील निकाल…

काल दि २२ फेब्रुवारी पासून सलग ३ दिवस पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी ही सुरु झाली आहे. आज या सलग सुनावणीचा दुसरा दिवस आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवादास सुरुवात केली. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर पुढील आठवड्यात शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडणार आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत येण्याची शक्यता कमी आहे. तर याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले आहे की या प्रकरणाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो.

विधानसभेच्या उपाध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं. त्यांचे अधिकार अबाधित ठेवले असते तर त्यांनी हा निर्णय दिला असता. उपाध्यक्षांनी शिंदे गटाला म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण त्यांना ते करता आलं नाही. त्यांना डिसेबल केलं गेलं, असं देसाई म्हणाले. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय त्यावर कसा मार्ग काढेल हे पाहावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

समता पार्टीला कोण खतपाणी घालतं? आम्हाला मशाल चिन्ह दिलं. आम्ही मशाल चिन्हावर पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. पण लोकशाहीत कोणी आडकाठी करणार असेल, त्यांच्यामागे कोणती शक्ती असेल, ही शक्ती खतपाणी घातलं जात असेल तर ते कितपत योग्य आहे? समता पार्टी डी रजिस्टर झाली. त्यांचं चिन्ह फ्रि कधी झालं? यावर निवडणूक आयोगाकडे दस्ताऐवज आहेत. असं असतानाही कृत्रिमरित्या समता पार्टीला चिन्ह मिळण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय ते खपवून घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा :

विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच, MPSC विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक तूर्तास रद्द

MPSC की निवडणूक आयोग, मुख्यमंत्र्यानी दिले स्पष्टीकरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version