spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray : आता बास अति होतंय… म्हणत सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे संतापले!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या हातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेलं. यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने यासाठी भाजपला जबाबदार धरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या हातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेलं. यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने यासाठी भाजपला जबाबदार धरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

तुम्ही मुख्यमंत्री झाला, पक्ष फोडला ते ठीक आहे. पण आता यांना पक्षप्रमुख व्हायचं आहे. हे अती होतंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला राग व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता, उद्धव ठाकरे कधी संतप्त होताना दिसत नाही. मात्र आज त्यांनी आता बास म्हणत सूचक विधान केलं आहे.

हे ही वाचा :  Uddhav Thackeray Live : फेसबुक लाईव्हमार्फत उद्धव ठाकरेंनी साधला जनतेशी संवाद…

शिवसेनापक्ष प्रमुख म्हणून होण्याचा प्रयत्न केला जातोय. याचे वाईट वाटते. आपला मेळावा होऊ नये म्हणूनही काही जणांनी प्रयत्न होते. एकीकडे पंचतारांकितपणा होता. दुसरीकडे आपले साधे शिवसैनिक होते. आम्ही काहीही ठेवलं नव्हतं. माझ्या शिवसेनेसाठी मी काहीही करेल असा विचार करुन ते मेळाव्यासाठी आले होते, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. या लोकांनी स्वत:च्या आईच्या पोटात खंजीर खुपसला. शिवसेनेचा घात केला. आता काय मिळणार असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

तसेच पुढे यांनी त्यांच्या संबोधनात शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे म्हणाले की, यांना काय साधयचं आहे, जो मिंधे गट आहे त्यांचा भाजप कसा उपयोग करुन घेतोय ते त्यांना कळत नाहीये. याचं उदाहरण देताना ठाकरे म्हणाले की, टीव्हीवर सरबताची जाहीरात येते. अमिताभजी सरबताची जाहीरात करतात. ती जाहीरात पाहूण आपण चांगल्या दुकानातून किंमत देऊन ती बाटली विकत घेतो, बाटली घरी आणल्यानंतर ती जपून वापरतो फ्रीजमध्ये ठेवतो, पण सरबत संपल्यानंतर ती कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. तसच यांचं होणार आहे. यांचा उपयोग आता संपत चालला आहे. चिन्ह गोठवून झालं आता यांचा आणखी काय राहीलं आहे उपयोग काय राहीला आहे?, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाला, पक्ष फोडला ते ठीक आहे. पण आता यांना पक्षप्रमुख व्हायचं आहे. हे आती होतंय, असं म्हणत उद्धव म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

फेसबुक लाईव्हमार्फत उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका; ४० डोक्याच्या रावणानं …

उद्धव ठाकरे यांच्या गटाची चिन्ह ठरली…

शिवसेना संपवण्याचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदेंचा वापर – सुषमा अंधारे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss