उद्धव ठाकरे यांची PC LIVE

उद्धव ठाकरे यांची PC LIVE

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. थेट बाबरी विषयाला हात घालून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेची सुरवात केली. उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडले. बाबरीच्या आठवणीतील खंदकातील अनेक उंदीर आता बाहेर पडायला लागले आहेत असं त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. आणि लगेच त्यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. जेव्हा बाबरी मशीद ही पाडण्यात आली तेव्हा अगदी सहजरित्या भारतीय जनता पक्षात बसलेले आघाडी नेत्यांनी हे आमच्या पक्षाचे काम नसून हे सर्व काही शिवसेना पक्षाकडून करण्यात आले आहे असे थेट विधान करण्यात आले ओटे. त्यामुळे तेव्हा जर तुम्ही तुमचे नपुंसकत्व दाखवले मग आता तुम्ही या विषयाला हात का घातला असा थेट सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

माझ्या वडिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा मला आणि त्यांना देखील सार्थ अभिमान आहे असे मी मानतो. त्यावेळी भाजपच्या अंगलटाशी हा विषय येऊ नये म्हणून भाजपने अगदीस सहजरीत्या बाबरी मशिदीचा विषय झटकावून दिला. म्हणूनच तेव्हापासूनच भारतीय जनता पक्षा कडे कधीच शौर्य नव्हतं . तास बघायला गेलं तर मुस्लिम बांधवांच्या दर्ग्याचे संरक्षण सुद्धा शिवसेना पक्षाकडूनच कार्यात आले यात काही शंकाच नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून सांगावं खर हिंदुत्व म्हणजे काय ? आणि त्याची त्यांनी स्पष्ट करावी. नुसतेच आम्ही घेतलेल्या सभेला जी जागा उपलब्ध असेल त्या जागी नुसते गोमूत्र शिंपडून तुम्ही हिंदूद्वा दाखवणार असला तर त्याला हिंदुत्व म्हणत नाही हे भारतीय जनता पक्षाने लक्षात घेतले पाहिजे असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर केला आहे.

आता आमच्या पक्षातून गेलेल्या मिंदे गटाने खरी भूमिका घेतली पाहिजे कारण भाजपकडून बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला जात असताना सुद्धा मिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध करण्याऐवजी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहे. तसेच बाळासाहेबांच्या प्रति जर आदर असेल तर चंद्रकांत पाटील यांच्या पदाचा राजीनामा मागावा आणि जर असे होत नसेल तर तुम्ही दखल तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आमच्या पक्षातून गेलेल्या मिंडे गटाला तुम्ही भाजपमध्ये सामावून घेतले खरे पण सध्या सध्या भाजपाची परिस्थिती प्रॉस्थिती हि सहनही होत नाही आणि सांगता ही येत नाही अशी झाली आहे.असा टोला भाजप पक्षाला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हाहन केलं आहे की, तुम्ही जर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांच्या हिंदुत्वाला मनात असाल तर बाळासाहेबांबद्दल केलेल्या अपमानाचा तुम्ही निषेध कारवायास हवा. आणि जर तुम्ही निषेध किन्वा राजीनामा घेतला नाही तर तुम्हाला मी आव्हाहन करतो शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि फोटो वापरण्याचा अधिकार तुमहाला दिला जाणार नाही. त्याचबरोबर शिवसेना नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही. आणि जर हे पण तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. असे ठाम मत उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडले.

हे ही वाचा : 

उदय सामंतांची मान्य केली मागणी, CM एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

युवा नेते आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर

संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमने – सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version