उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीचे मतभेद समोर येऊ लागल्याने ठाकरे पवारांची महत्त्वपूर्ण बैठक?

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या राहत्या घरी सिल्व्हर येथे दोघांची भेट घेणार आहेत. 

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीचे मतभेद समोर येऊ लागल्याने ठाकरे पवारांची महत्त्वपूर्ण बैठक?

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या राहत्या घरी सिल्व्हर येथे दोघांची भेट होणार आहे. महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. कालच निवडूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीयत्व रद्द केले होते त्यामुळे राजकीय चर्चांना उदान आले होते. त्यातच भाजपचे जेष्ठ नेते उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबरी मशीदपाडल्या प्रकरणातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटलांचा निरोप घेतला.

महाविकास आघाडीत सध्या मतभेदांमुळे सारं काही आलबेल नाही, असं चित्र असताना उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट होत आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याचं बघायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचं म्हणणं होत तर या भूमिकेवर शरद पवार यांची वेगळी भूमिका पाहायला मिळाली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं होत.

पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सारख्या बलाढ्य पक्षाने पराभूत करायच असेल तर महाविकास आघाडीला एकत्र राहणं आवश्यक आहे. याच विचारावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राजकीय चर्चा होण्यची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवर एकमत नसल्याचं पाहायला मिळत आहे. या बैठकीतून वेगवेगळ्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीत सुरु असलेले वाद हे दोन्ही बडे मिटवू शकतील असं म्हंटल जातंय. सोबतच या भेटीत येऊ घातलेल्या निवडुकांमध्ये जागा वाटपावरून या दोन्ही बड्या नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version