spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत;आशिष शेलार

सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांन शाब्दिक वाद सुरु असल्याचं दिसून येत आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. यासाठी त्यांनी ‘सामना’मध्ये छापून आलेल्या एका वृत्ताचा संदर्भ दिला आहे.

आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंचा वैचारिक लोच्या झाल्याची टीका केली आहे. “उद्धवजी, तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोचा तर केलाच आहे. त्याही पुढे पोटनिवडणुकीत लाल बावट्याकडून, कम्युनिस्टांकडूनही तुमही समर्थन मागितलं. तुमचा प्रश्न अलहिदा आहे. पण आता मुंबई महानगर पालिकेत पराभव दिसू लागल्यावर तुम्ही समाजासमाजात विभागण्या का करत आहात? धर्म, जात यांची पेरणी का करत आहात? तुम्हाला काय गरज आहे त्याची? भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. ना जातीवर, ना धर्मावर, केलेल्या विकासकामांवर आम्ही मतांची बेगमी करू”, असं शेलार म्हणाले.

यावेळी आशिष शेलार यांनी संबंधित वृत्तामध्ये केलेल्या ‘मराठी मुस्लीम’ या उल्लेखावर आक्षेप घेतला. “२२ ऑक्टोबरला सामनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी मुस्लीम यांचं समर्थ अशी बातमी झळकली. समर्थन कुणी कुणाला द्यावं, घ्यावं तो ज्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण खरंतर स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मतांची पेरणी करण्याचा नवा विचार ठाकरे गटाने मांडला आहे. या समर्थनात लांगुलचालनाचा राजकीय स्वार्थी वास आहे. ही मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठीची केलेली ही राजकीय पेरणी आहे. त्यांनी मराठी मुस्लीम असा शब्द वापरला”, असं शेलार म्हणाले. “तुम्ही ‘मराठी मुस्लीम’ची मांडणी करत आहात, मग मराठी जैन, मराठी गुजरातींशी तुमचं वैर का? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाही? मराठी हिंदू या विषयाशी तुम्ही फारकत का घेत आहात? भाजपाची भूमिका मराठी मुंबईकराची आहे”, असंही आशिष शेलार यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत असल्याची टीका आशिष शेलार यांनी यावेळी केली. “जे स्वप्न औरंगजेब बघून खस्ता झाला, मृत्यूमुखी पडला. ते महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर कब्जा करण्याचं औरंगजेबी स्वप्न उद्धवजी तुमच्या या बेगमीतून तुम्ही मराठी माणसावर का लादताय? औरंगजेबाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली आहे का? हा आमचा तुम्हाला सवाल आहे”, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

हे ही वाचा :

लाल सिंग चड्ढा हा चित्रपट देशवासियांवरील ‘वैयक्तिक संकट’ आहे -कंगना रणौत

फडणवीसांकडून मंजूर झालेल्या आकृतिबंधावर प्रश्नचिन्ह

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss