अवघ्या काही तासांत पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

आज दिनांक २३ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडणार आहे.

अवघ्या काही तासांत पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

आज दिनांक २३ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडणार आहे. अवघ्या काही तासांत उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. आजच्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी लाखोंची गर्दी जमणार असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आजच्या या सभेकरीता उद्धव ठाकरे जळगावमध्ये पोहचले आहेत. या सभेकरता पाचोऱ्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी आणि भगवे झेंडे संपूर्ण पाचोरा शहरात ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहेत. सभेपूर्वीची वातावरण निर्मिती ठाकरे गटाकडून करण्यात आली असून सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर डॉग स्क्वॉडकडून उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळाची पाहणी करण्यात येत आहे.

आजच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा ही खेड, मालेगाव येथे झाल्या आहेत. या सभांमधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलेच घेरले होते. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे याच सभांमधून त्यांनी शिंदे गटासह भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आज होणाऱ्या जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

आज उद्धव ठाकरे यांची तिसरी मोठी सभा आज जळगावच्या पाचोऱ्यात होत आहे. या सभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कालच सभास्थळी दाखल झाले होते. तर राऊत यांच्यासह ठाकरे गटातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी देखील आज होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे आज होणाऱ्या या सभेमुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढला आहे. त्यामुळे आजच्या या सभेतून उद्धव ठाकरे कुणावर ‘बाण’ सोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version