आता भाजपला चित्ता सरकार म्हणायचं का?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

आता भाजपला चित्ता सरकार म्हणायचं का?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

भारतात अनेक वर्षांनी देशात चित्ता आणण्यात आला आहे. सत्तर वर्षानंतर भारतात प्रथमच चित्ता आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला खोचक टोला लगावला आहे. आज अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आपण त्यांना आता चित्ता सरकार म्हणायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.

हेही वाचा : 

Chandigarh University Case : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित MMS लीक, पोलिसांची चौकशी सुरु

शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकदा भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी पेंग्विन सेना किंव्हा पेंग्विन सरकार असे हिणवले आहे. यालाच पलटवार म्हणून ‘आम्ही भाजपला चित्तासेना म्हणायचं का?’ असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीत केला.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेफ अली खानने उडवली ‘या’ अभिनेत्याची खल्ली

काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ठोठावलेला दंड दोन महिन्यात भरायचा आहे. मग आता सांग सांग भोलानाथ हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून, अडिच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून, सोशल मिडियावर “पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या” पेंग्विन सेनाप्रमुखांकडून, वसूल करायचा का?”. या मुद्यावर आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना पेंग्विन सेना म्हणून हिणवले होते.

Jivitputrika Vrat 2022: ‘जीवितपुत्रिका व्रत’ संबंधात तुम्हला माहिती आहे का?, जाणून घ्या सविस्तर माहिती

Exit mobile version