spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका, बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी…

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी केली जात आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी केली जात आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अश्यातच आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या येण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, त्यांनी लडाखला जावं, पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी खर्च तयार करायला तयार आहे. त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा,असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावं, त्यांच्या सर्व खर्च मी करतो, त्यांच्या हॉटेलचा खर्च देखील मी करतो. पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील परिस्थिती पाहावी. देवेंद्र फडणवीस यांनी अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावं. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावं. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यामुळे एखाद प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यावरून महाविकास आघाडीमध्ये अनेक मतभेद आहेत. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हाविकास आघाडीला प्रश्न विचारता मग महायुतीचे काय बरं चाललंय का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मविआमध्ये आमचं सगळं बरं सुरू आहे. जागावाटपाबाबत भांडणं नाहीत, थोडीशी खेचाखेच आहे. जागावाटपावर थोडी खेचाखेच होतेच, भाजपसोबत आमची युती होती, तेव्हा सुद्धा खेचाखेच व्हायची,असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यामुळे अरविंद केजरीवालांना अटक केली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भष्ट्राचाऱ्यांना सोबत घेऊन केलेली युती नैसर्गिक कशी, भ्रष्ट्राचार तुमच्यात नैसर्गिक आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून पेच नाही. जागावाटपाबाबत खेचाखेच सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये आमची बोलणी झालेली आहेत. अंतिम निर्णय लवकरच होईल,असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, सगळे ठग भाजपमध्ये गेले, त्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो आहोत. भाजपची केविलवाणी धडपड सुरु आहे. खरे ठग कोण आहेत, हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यामुळे सर्वांसमोर आलेलं आहे. ठगांचा मेळा त्यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्व मुख्य ठग त्यांच्याकडे गेल्यामुळे पक्ष आता मोकळा झाला अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल ठग होते, हे मी किंवा उद्धव ठाकरे यांनी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यांनी सगळे ठग घेतल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो,असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, दिल्लीत आज महत्वाची बैठक

राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर कपिल शर्माने मांडले आपले मत; म्हणाला..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss