spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray यांचा आज दिल्ली दौरा होणार सुरु; दरम्यान भेटणार ‘या’ महत्वाच्या नेत्यांना

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे दौरे हे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. या दौऱ्यांमधून स्वपक्षाचा विस्थार आणि स्वपक्षाच्या ज्या जागा आहेत त्या जिंकून याव्यात म्हणून हे दौरे केले जातात. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकासआघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांची भेट घेणार आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे पुढील तीन दिवस ते राजधानी दिल्लीत महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी दिल्लीत दाखल होणार, त्यांच्यासोबत पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील असणार आहेत.

सध्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशावेळी उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन तीन दिवस विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीतील या नेत्यांची घेणार भेट :

 लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांचा समावेश आहे. या भेटीदरम्यान आगामी विधानसभा निवडणूक, जागावाटप आणि इतर रणनिती आखली जाणार आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे हे आज दुपारी दिल्लीतील मराठी माध्यमांशी तर उद्या राष्ट्रीय मीडियाशी संवाद साधणार आहेत.

काय असेल महाविकास आघाडीची रणनीती ?

येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात काय ठरतं, कोणत्या जागांवर शिक्कामोर्तब केला जाणार आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडीची रणनिती कशी असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आमदार अपात्रते बाबतच्या सुनावणी बाबत पुढे काय ?

आमदार अपात्रता सुनावणीबाबत मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरु असतानाच, आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यामध्ये दोनी बाजूनी प्रश्नउत्तरे करण्यात आली. त्याच वेळी राष्ट्रवादीने अजून थोडावेळ मिळावा असे संगितले. त्यावरूनच या सुनावणीला तूर्तास स्थगिती देऊन २ आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. यावर आता पुढील सुनावणी ही २ आठवद्यांनंतर होईल असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

हे ही वाचा:

आमदार अपात्रतेबाबत Supreme Court मध्ये होणार सुनावणी; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

“ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे अशा ..” Devendra Fadnavis यांनी दिले कार्यकर्त्यांना आश्वासन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss