spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अंधेरी पोटनिवणुकीनंतर उद्धव ठकरे यांची पहिली प्रतिक्रिया; ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७ उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, यावेळी त्या काहीशा भावूक झाल्याचे दिसून आले. ऋतुजा लटके म्हणाल्या, “सर्वप्रथम मी म्हणेण हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जी जनसेवा केली, विकासकामे केली. त्याची पोचपावती ही विजयाने मिळालेली आहे. मतदारांनी त्याची एक परतफेड ही केलेली आहे.”

मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ऋतुजा लटके यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. “जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं. ही आता सुरूवात झाली आहे. लढाईची सुरूवातच विजयाने झाली आहे. या पुढेचे देखील सर्व विजय मिळवेन. आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. परंतु, ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवलं ती निवडणूकच विरोधकांनी लढवली नाही. चिन्ह कुठलं पण असो जनता आमच्यासोबत आहे. पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली. शिवाय नोटाला जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती, अशा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपसह शिंदे गटाला लगावला.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे,” असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी आपल्या वक्तव्यावर दिलं. गुजरातमधील निवडणुकीसाठी काही इच्छुक आले आहेत. पण आम्ही संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आपण सहभागी होऊ का नाही हे नक्की नाही, पण आपले नेते सहभागी होतील असं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा :

आदित्य ठाकरेंच्या संवाद मेळाव्याला पोलिसांचा ‘ग्रीन सिग्नल’

भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता; आशिष शेलार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss