spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसैनिकांचं मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन, ‘गद्दारीला जाळणारी ‘मशाल’ ; ठाकरेंची प्रतिक्रिया

शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि शिवसेना नाव वापरण्यावर निवडणूक आयोगाने मर्यादा आणल्यानंतर आता ठाकरेंना नवी ओळख मिळाली आहे. आता पक्षाचं नाव असेल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर निशाणी असेल धगधगती मशाल निवडणूक आयोगाने जसंही ठाकरेंना मशाल चिन्ह दिलंय तेव्हापासून शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अशा सगळ्या वातावरणात आज अंधेरीच्या शिवसैनिकांनी धगधगती मशाल घेऊन मातोश्रीवर जात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके याच विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. यावेळी अन्याय जाळणारी मशाल आपल्याला मिळाली आहे. मशालीचे तेज आणि महत्व ओळखा, असं सांगत आपले पुढील इरादे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

Beed BJP : बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियानी यांनी स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या, अद्यापही कारण अस्पष्ट

आपल्याला मिळालेली ही मशाल गद्दारीला जाळणारी आहे’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नव्या चिन्हाचं स्वागत केलं. अंधेरी येथील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या आले होते. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.

आज अंधेरीच्या शेकडो शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन मोठं शक्तीप्रदर्शन केलं. शिवसेना आमच्या हक्काची नाही कुणाची बापाची…. अंधेरी विधानसभा आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची… उद्धव साहाब तुम विशाल हो, हमारी निशाण मशाल हैं… अशा घोषणांनी शिवसैनिकांनी मातोश्रीचा परिसर दणाणून सोडला.

Ram Setu Trailer: अंगावर शहारे आणणारा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव मिळालेलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं. मात्र शिंदे गटाला अद्याप चिन्ह मिळालेलं नाही. मंगळवारी रात्रीपर्यंत हे चिन्ह मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून आज नव्याने तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड या चिन्हांचा पर्याय दिलेला आहे. तळपता सूर्य या चिन्हासाठी शिंदे गट आग्रही असल्याचं कळतं.

विप्रोने ३०० “मूनलाइटर्स” कसे पकडले? विप्रोची थिअरी होतेय ट्विटरवर व्हायरल

Latest Posts

Don't Miss