उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र, ‘या’ चिन्हाची आणि नावाचं मागणी

उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र, ‘या’ चिन्हाची आणि नावाचं मागणी

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला आणि महाराष्ट्रामध्ये असलेले महविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता दोन्ही गटाकडून खरी शिवसेना कोणती यावरून मोठा वाद दिसून येत आहे. काल निवणूक आयोगाने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलच तापल्याचे दिसून येत आहे. आता सर्वांचं लक्ष शिंदे आणि ठाकरे गट कोणतं नाव आणि चिन्हाची मागणी करणार यावर आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत काही नावे आणि काही चिन्हांचा प्रस्ताव ठेवला आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून या चिन्हांची मागणी होऊ शकते. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हाची मागणी केली आहे. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावांची मागणी केली आहे.

शिंदे गटापुढे तलवार या निवडणूक चिन्हाचा पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच शिंदे गटानेही शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर दावा सांगितला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांनुसार, शिवसेना हे नाव ठाकरे आणि शिंदे दोघांनाही वापरता येणार नाही. त्याऐवजी हे दोघे शिवसेना आणि इतर काही असं नाव वापरू शकतात. म्हणजे शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट अशा पद्धतीने इतर नावं हे दोन्ही गट वापरू शकतात.

हे ही वाचा:

‘धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा…’ – अनिल देसाई

वाडवडीलांनी आयुष्यभर जे कमावलं होत ते मुलांनी मिनिटांमध्ये घालवला – एकनाथ खडसे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version