spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंची फडणवीसांना साद?, कटुता संपवण्याच्या वाटेवर

राज्यात सत्तासंघर्षानंतर भाजप आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या खेळी झडताना दिसत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कटुता संपवा असे आवाहन ठाकरे गटाकडून फडणवीस यांना करण्यात आलं आहे.

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत सामोचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून, मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. विजयानंतर आनंद होत असला तरी उन्माद चढणे हे प्रौढत्वाचे लक्षण मानले जात नाही. श्री फडणवीस यांच्यात नव्या सत्तांतरापासून प्रौढपण आलं असल्याचे जाणवू लागले आहे’,असं सामनामध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : 

परतीच्या पावसानं सामान्यांना दिला महागाईचा झटका! भाज्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ

नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!! असे आवाहन सामना अग्रलेखातून फडणवीस यांना करण्यात आलं आहे.

सामनामध्ये पुढे म्हटलं आहे की, ‘दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. फडणवीस यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यावर महाराष्ट्राने विचार करायला हवा महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले.’

फडणवीस हे ‘सागर’ बंगल्यावर खूश आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज ‘वर्षा’वर असते व आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो. असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत.

Tata Airbus Project : प्रकल्प गुजरातला जातात, मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत ; जयंत पाटील

शिवसेना नष्ट करण्यासाठी सर्व येरागबाळय़ांची मोट बांधणे हा काही प्रामाणिकपणा नाही. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास विरोध करणे ही भूमिका इतर कोणी घेतली तर त्यास मान्यता असूच शकत नाही, पण फडणवीस यांच्यासारख्या शहाण्याने तशी भूमिका घेणे महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारे नव्हते. खरी शिवसेना कोणती? हे फडणवीसांना पक्के माहीत आहे व त्यांनी गळय़ात जो ‘खरी शिवसेना’ म्हणून धोंडा बांधून घेतला आहे तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे, हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत. पण त्यांचे शहाणपण कोठेतरी भरकटल्यासारखे झाले आहे.

‘महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत.या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल. शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे.’ असं सामन्यातून म्हटले.

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा घेतला समाचार, म्हणाले जे लोक हँग झाले…

Latest Posts

Don't Miss