spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा; उध्दव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

दरम्यान पक्ष बांधणी आणि पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आजपासून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई: काल शिंदे – फडणविस सरकारने बहुमत चाचणीला सामोरे जात बहुमत सिद्ध केले आहे. राज्यात शिंदे गटाने नवीन सरकार स्थापन करताच बंडखोर आमदारांन विरोधात आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. आज शिवसेनेच्या बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या जागी पर्यायी उमेदवार शोधा आणि आपल्या मतदारसंघाला जास्तीत जास्त वेळ द्या असा आदेश उद्धव ठाकरेंकडून देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे 40 आमदार गेल्यानंतर पक्षाला मोठी खिंडार पडल्यामुळे उध्दव ठाकरे आता पक्ष संघटन वाढवण्यासाठी  सज्ज झाले आहेत. नाशिकमधील आमदार दादा भुसे आणि नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे हे पक्षातून बाजूला झाल्यामुळे महाराष्ट्र केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी हे पाऊल उचलले आहे. दोघांना ही टक्कर देणारा ताकदीचा उमेदवार शोधा असेही आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पुढचं पाऊल काय असणार? याबाबत सगळीकडे ही एकच चर्चा रंगली होती. दरम्यान पक्ष बांधणी आणि पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आजपासून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज राज्यातील महिला आघाडीतल्या प्रमुख महिला, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक होत आहे. शिवसेना भवन इथं आज ही बैठक होणार होती. बंडखोर आमदारांन विरुद्ध आक्रमक होत हे पाऊल शिवसेनेनं उचललं आहे.

Latest Posts

Don't Miss