BBC कार्यालयारील आयकर विभागाच्या धाडीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयावर…

BBC कार्यालयारील आयकर विभागाच्या धाडीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयावर…

आज BBC या वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसीने एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली होती. या डॉक्युमेंट्रीचे नाव “इंडिया- द मोदी क्वेश्चन” होते. या डॉक्युमेंट्रीची चांगलीच चर्चा भारतातच नव्हे तर जगभरात सुरु आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याच कारणामुळे भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता बीबीसीच्या (BBC) दिल्लीमधील कार्यालया सह मुंबईच्या देखील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, “आपण लोकशाहीचे जे चार स्तंभ म्हणतो, त्यामध्ये न्यायव्यवस्था, प्रशासन, शासन यांच्यासह महत्त्वाचा स्तंभ म्हणजे माध्यम असतो. मी तुमच्याशी बोलत असताना या बातमीसोबतच बीबीसीच्या कार्यालायवर प्राप्तिकराची लोक गेली आहेत, ही सुद्धा बातमी सुरू असेल. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं? म्हणजेच काय, आम्ही वाटेल ते करू पण आवाज नाही उठायचा. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही जी पाशवीवृत्ती आपल्या देशात आज फोफावायला बघते आहे, ती आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या संपूर्ण देश खावून टाकेल.” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बीबीसी प्रकरणावर सरकारला टोला लगावला आहे.

काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” (India The Modi Question) या डॉक्युमेंट्रीवरून भारतामध्ये बीबीसी वृत्तसंस्थेचा विरोध करण्यात आला त्याच बरोबर बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या डॉक्युमेंट्री या डॉक्युमेंट्रीला भारतामध्ये प्रदर्शित करण्यास केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली. त्यानंतर आज आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर छापे टाकले आहेत.या छाप्यादरम्यान कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल, फोन आयकर विभागाने काढून घेतले आहेत . आता बीबीसीची यावर काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं देखील खूप महत्वाचे आहे.

हे ही वाचा : 

Valentine Day 2023, आज घरच्या घरी बनवा Chocolate Heart Peanut Butter Cookies

BBC ला डॉक्युमेंट्री पडली महागात ? देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version