उद्धव ठाकरेंचे राईट हँड नार्वेकरांची भाजपश्रेष्ठींशी जवळीक

उद्धव ठाकरेंचे राईट हँड नार्वेकरांची भाजपश्रेष्ठींशी जवळीक

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि शिवसेनाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा एक ट्विट सध्या जोरात चर्चेत आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी दणदणीत विजय मिळवला. मैदान मारुन काही तास उलटत नाहीत, तोच नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्वीटची चर्चा रंगली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून ट्वीट केलं आहे. निमित्त आहे ते शाहांच्या वाढदिवसाचं. परंतु ठाकरे-भाजप वादाच्या पार्श्वभूमीवर”माननीय गृहमंत्री श्री अमित शाह जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! देव करोला तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो” अशा आशयाचं इंग्रजी ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि सर्वात विश्वासू मानले जातात. काही काळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने नार्वेकरांनी गट बदलला का अशा चर्चा उडाल्या होत्या. मात्र यथावकाश ठाकरे आणि नार्वेकर या दोघांनीही त्या चर्चा धुडकावून लावल्याने धुरळा खाली बसला. परंतु उद्धव ठाकरे हे वारंवार भाजपवर तोफ डागताना दिसतात, तसंच ‘मातोश्री’वरील बंद खोलीतील चर्चांवरुन अमित शाहांना बोल लावताना दिसतात, असं असतानाही ठाकरेंचे ‘राईट हँड’ नार्वेकर मात्र ट्विटरवरुन त्यांना जाहीर शुभेच्छा दत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर बोलताना नार्वेकरांनी ‘उद्धव साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवार हो म्हणून परवानगी दिली, त्याच्या नंतर पवार साहेबांनी मंजुरी दिली, शेलार साहेबांनी दिली, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी सभा घेतल्या’ असं म्हणत सर्वांचेच आभार व्यक्त केले होते. विशेष म्हणजे, एमसीएच्या अपेक्स काऊन्सिलच्या ९ जागांसाठी नार्वेकरांसह २३ जण रिंगणात होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे एमसीएचे सदस्य असूनही तिघांनीही निवडणुकीत मतदान केलं नाही. मात्र २२१ मतांसह नार्वेकर विजयी झाले. अपेक्स काऊन्सिलच्या उमेदवारांमध्ये नार्वेकरांना मिळालेली ही सर्वाधिक मतं आहेत.विशेष म्हणजे, एमसीएच्या अपेक्स काऊन्सिलच्या ९ जागांसाठी नार्वेकरांसह २३ जण रिंगणात होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे एमसीएचे सदस्य असूनही तिघांनीही निवडणुकीत मतदान केलं नाही. मात्र २२१ मतांसह नार्वेकर विजयी झाले. अपेक्स काऊन्सिलच्या उमेदवारांमध्ये नार्वेकरांना मिळालेली ही सर्वाधिक मतं आहेत.विशेष म्हणजे, एमसीएच्या अपेक्स काऊन्सिलच्या ९ जागांसाठी नार्वेकरांसह २३ जण रिंगणात होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे एमसीएचे सदस्य असूनही तिघांनीही निवडणुकीत मतदान केलं नाही. मात्र २२१ मतांसह नार्वेकर विजयी झाले. अपेक्स काऊन्सिलच्या उमेदवारांमध्ये नार्वेकरांना मिळालेली ही सर्वाधिक मतं आहेत.

हे ही वाचा :

पंतप्रधान मोदी आज घेणार रोजगार मेळा, ७५,००० लोकांना मिळणार नियुक्ती पत्र

Dhantrayodashi 2022 : आज दिवाळीचा दुसरा दिवस ‘धनत्रयोदशी’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version