उद्धव ठाकरे यांची हाय कोर्टात धाव; निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल

उद्धव ठाकरे यांची हाय कोर्टात धाव; निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray camp) उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली. निवडणूक आयोगाने (Election Commission) आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नवा गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे. तसेच ही याचिका आजच तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर दिल्ली उच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. आपल्या तीन पर्यायी चिन्हांना संरक्षण मिळावे ही मागणीदेखील शिवसेनेने कोर्टात याचिकेद्वारे केली आहे. आमच्या विचारसरणीशी निगडित चिन्ह फ्री सिम्बॉल यादीत नाही. पण आम्हाला चिन्ह निवडण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच पर्याय दिले आहेत असेही शिवसेनेने म्हटले आहे. दिल्ली हायकोर्ट या प्रकरणी काय आदेश देते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोमवारी अथवा मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, निवडणूक आयोगाने या प्रकरणात सुनावणी करण्याची आवश्यकता होती. निवडणूक आयोगाने घाईघाईने हा निर्णय घेतला. दिल्ली हायकोर्टासमोर ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. निवडणूक चिन्हाबाबत आमचे मुद्दे हायकोर्टात मांडले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाला काही संदर्भ आहेत. हे संदर्भ लक्षात घेतले गेले नसल्याचे देसाई यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Happy Birthday Rekha : रेखासोबत सहकलाकाराने गैरवर्तन केल्या प्रकरणी बिग बी संतापले…

पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा… ; सामना अग्रेलेकातून टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version