उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे- निलेश राणे

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे- निलेश राणे

राणे कुटुंब नेहेमीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वर टीका करण्याची संधी सोडत नाही. पुन्हा एकदा नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेतून बंद करून शिंदे गटात शामिल झालेले आमदार संतोष बांगर यांच्या गादीवर शिवसनिकांन कडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्या संधर्बात बोलतांना निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावं हेच सुचत नाहीये. आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं? हे मला वेगळं सांगायची गरज नाही. अशा पिसाळलेल्या लोकांचं काय करायचं, हे मी सकाळीच सांगितलं आहे. ते ठाकरे आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं.

“२५ सप्टेंबर रोजी संतोष बांगर यांच्यावर गाडीवर अमरावतीमध्ये हल्ला झाला. यामुळे ते चांगल्या भाषेत ऐकणार नाहीत, असं दिसतंय. त्यांना फटकेच द्यायला पाहिजे. त्यांना त्याच भाषेत बोललं पाहिजे कारण त्यांना दुसरी भाषा कळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावं”, असा धमकीवजा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

२५ तारकेला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या पत्नी आणि बहिणीसह अमरावती मध्ये देवदर्शनासाठी साठी गेले असताना त्यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनकडून हल्ला करण्यात आला. “आला रे आला, गद्दार आला”, “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या आहेत. या सर्व घडामोडीनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दांत टीकास्र सोडलं आहे.

हे ही वाचा:

रायगडावर पिंडदान करण्यात गैर काय?- शिवभक्त

Shinde vs Thackeray SC Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर युक्तिवाद सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version