spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राचा अपमान कराल तर कोल्हापुरी जोडा दाखवू : उद्धव ठाकरेंची राज्यपालांवर जहरी टीका

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात कोश्यारी यांच्या विषयी निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यापालंचे विधान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत, “राज्यपालांचे हे विधान अनावधानाने केलेले नाही, किती काळ केवळ त्या खुर्चीत बसलाय म्हणून एखाद्या व्यक्तीचा आदर ठेवायचा. गेल्या दोन अडीच वर्षांपासून जी व्यक्ती राज्यपाल पदाच्या खुर्चीत बसलीये. मला त्या पदाचा अवमान करायचा नाहीये. पण एक गोष्ट खरी आहे की त्या खुर्चीचा मान, खुर्चीत बसलेल्याने राखायचा असतो. तो भगतसिंह कोश्यारी यांनी ठेवलेला नाही. गेल्या काही दिवसांपासूनची त्यांची वक्तव्य पाहून महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का येतात, असा प्रश्न मला पडलाय. मी मुख्यमंत्री असतानाही जेव्हा लोकांचे जीव जात होते लॉकडाऊनमध्ये तेव्हा त्यांना राज्यातील सर्व प्रार्थनास्थले उघडायची घाई झाली होती. त्यांनी या संदर्भात मला पत्र देखील लिहिले होते. त्याचे योग्य ते उत्तर मी त्यांना दिले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले पुढे म्हणाले, “मध्यंतरी सावित्रीबाई फुलेंबद्दलही बिभत्स उद्गार त्यांनी काढले. आता महाराष्ट्रात तीन वर्षे राहतायत, सगळे वरपलेय, मान मरातब ओरबाडलेला आहे. आणि आता महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करतायत. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखे आहे. कोश्यारी यांना मुंबईचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास त्यांना माहित नसावा. “महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा” असे म्हणायची वेळ आली आहे. असे ठाकरे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

अब्दुल सत्तारांच्या प्रयत्नांना यश, अर्जुन खोतकरांचा शिंदेंना पाठींबा

Latest Posts

Don't Miss