उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ठरल्या ‘मविआ’च्या हल्लाबोल आंदोलनाचा ‘लक्षवेधी’ चेहरा

उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ठरल्या ‘मविआ’च्या हल्लाबोल आंदोलनाचा ‘लक्षवेधी’ चेहरा

राज्यातील नेत्याकडून महापुरुषांवर करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानंवर आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. परंतु या दोन्ही मोर्च्यात संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं ते म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे, ह्या देखील ‘माविआ’च्या या महामोर्च्यात सहभागी झाले आहे. रश्मी ठाकरे यांच्या सोबत माध्यमांनी संवाद साधण्याचा पर्यंत केला, मात्र त्यांनी प्रतिकिया देणं टाळलं आहे. रश्मी ठाकरे यांच्या सोबत आदित्य ठाकरे देखील आहेत.

हेही वाचा : 

महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चाला आरंभ Mahavikas Aghadi Mahamorcha

Exit mobile version