उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातल्या तीन अटी

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकीकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह हातातून गेले आहे, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाबाबत वाद विवाद सुरु आहेत, अशा विविध परिस्थितींना सामोरे जाताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या राज्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत.

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातल्या तीन अटी

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकीकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह हातातून गेले आहे, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाबाबत वाद विवाद सुरु आहेत, अशा विविध परिस्थितींना सामोरे जाताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या राज्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. तसेच उद्धव ठाकरे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.आज २२ फेब्रुवारी रोजी या दौऱ्यासंदर्भात मातोश्रीवर (Matoshree) कार्यकर्त्यांना संबोधित करत उद्धव ठाकरे म्हणाले ‘खेडमध्ये पाच मार्च रोजी मैदान अपुरे पडायला हवे, एवढी गर्दी सभेला करा’

उद्धव ठाकरे यांनी संवाद करताना कार्यकर्त्यांना तीन प्रश्न विचारले. उद्धव ठाकरे म्हणाले, आज मी तुम्हाला दोन चार अटी घालणार आहे. पहिली अट अशी आहे कि ‘खेड (khed ) हा आपला मतदारसंघ आहे, तो आपलाच राहयला हवा. दुसरी अट अशी कि इथल्या इच्छुकांची तयारी झाली आहे का? आणि तिसरी अट म्हणजे पाच तारखेला मैदान अपुरे पडायला हवे एवढी गर्दी सभेला असायला हवी. खेड हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, तो आपल्याकडेच राहिला पाहिजे, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावर कार्यकर्त्यांनी हो असं एकमताने उत्तर दिलं.

उद्धव ठाकरे पुढे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, “सभेच्या दुसऱ्या दिवशी शिमगा आहे, त्यांचा शिमगा रोजचाच असतो. त्यांना बोंबलायला लावू. तुमचा उत्साह दांडगा आहे. या सभेकडे सर्व राज्याचे लक्ष असणार आहे, कारण सत्तांतरानंतरची हि पहिली सभा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घ्या. सर्वसामान्य जनता मैदानात येणार आहे. ‘दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क येथे कांदा-भाकरी घेऊन शिवसैनिक (shivsainik )आले होते, ही आपली ताकद आहे. राहिलेला कांदा त्यांच्या नाकाला लावूया,”

हे ही वाचा :

दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा, शिवसैनिकांचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे…

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुखपद मिळणार का, काय असणार बैठकीनंतरचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version