spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“काका मला वाचवा” म्हणतं उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला – प्रवक्ते नरेश म्हस्के

Naresh Mhaske : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddahv Thackrey) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली.

Naresh Mhaske : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddahv Thackrey) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. महाविकास आघाडीत विविध मुद्द्यांवरून मतभेद सुरु असताना, या मतभेदाचं रूपांतर मनभेदात होऊ नये या साठी हि महत्त्वपूर्ण अशी बैठक असल्याचं म्हंटल जातंय. या बैठीकीवर आता शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. आजही काही बैठका होत्या मात्र त्या बैठका देखील रद्द झाल्या. या बैठका नक्की का रद्द झाल्या याची माहिती माध्यमांनी घ्यावी. आमच्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा गायब असल्याने आणि या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

शरद पवार आपली साथ सोडतात की काय ? अशी भीती वातल्यानेच ‘काका मला वाचवा’ असं म्हणत उद्धव ठाकरेनी घाबरून शरद पवार यांची आज त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे आडनावाचा वारसा मिळाला असला तरीही स्वाभिमानाचा वारसा मात्र उद्धव ठाकरे यांना लाभलेला नाही, त्यामुळेच कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या बाळासाहेबांचा मुलगा असूनही खाली मान घालून पवारांच्या घरी‌ त्यांची मनधरणी करायला जावं लागलं असं मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आज पक्ष गेले, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला अशी झाली असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा : 

प्लॅनेट मराठीवर १४ एप्रिलपासून चिकटगुंडे २

राजकणार भूकंप?, अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांचे ‘ते’ ट्वीट होतंय जोरदार व्हायरल

नामदेव शास्त्रींचा पंकजा मुंडेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss