केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत यानिमित्ताने भाजपने देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत यानिमित्ताने भाजपने देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत त्याचनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या 10 व 11 जून रोजी वेगवेगळ्या चार राज्यांमध्ये जाहीर सभा होणार आहेत. चार सभापैकी त्यांची एक सभा नांदेड जिल्यामध्ये होणार आहे. त्यामुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड जिल्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे आज नांदेड पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नांदेड शहरातील अबचलनगर मैदानावर आज भाजपची जाहीर सभा होणार आहे.

भाजपच्या या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून भाजपकडून या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपचे नांदेडमधील नेते अक्षरशः सभेच्या ठिकाणी तळ ठोकून आहे. त्यामुळे आज नांदेडमध्ये होणाऱ्या सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार आणि कोणालावर निशाणा साधणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह यांच्या या सभेच्या निमित्ताने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. ही अधिसूचना शनिवार १० जून २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. अमित शाह शनिवारी गुजरातमधील पाटण आणि महाराष्ट्रातील नांदेडमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. ११ जून (रविवारी) आंध्र प्रदेशला रवाना होण्यापूर्वी ते तामिळनाडूतील वेल्लोर येथेही एका सभेला संबोधित करणार आहेत.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version