७५,००० कोटी रुपयांचे ‘ग्रीन एक्स्प्रेस हायवे’ पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होणार तयार, नितीन गडकरींची नवी घोषणा

७५,००० कोटी रुपयांचे ‘ग्रीन एक्स्प्रेस हायवे’ पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होणार तयार, नितीन गडकरींची नवी घोषणा

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल भगतिसिंग कोश्यारी (Bhagatisingh Koshyari), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) उपस्थित होते. दरम्यान, यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना समृद्धी महामार्ग विदर्भ-मराठवाड्यासाठी वरदान ठरेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि एमएसआरडीसीचेही आभार मानले.

हेही वाचा : 

चंद्रकांत पाटीलांवर जो कोणी शाईफेक करेल, त्याला ५१ हजार रुपयांचं… ,चिथावणीखोर घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही औरंगाबादहून पुण्यापर्यंत हायवे बनवत आहोत. लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल. ज्यामुळं नागपूरहून पुणे केवळ सहा तासात पोहोचता येईल, हा माझा विश्वास आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात आम्ही सहा एक्सप्रेसवे बनवत आहोत. यामध्ये सूरत-चेन्नई महामार्गाचा समावेश आहे. यामध्ये साऊथकडे जाण्यासाठी मुंबई-पुण्यातून ट्रॅफिक जातं पण नव्या महामार्गामुळं प्रदुषणापासून या शहरांना मुक्ती मिळणार आहे. यात आम्ही सुरत चेन्नई, इंदौर-हैदराबाद, हैदराबाद-रायपूर, नागपूर-विजयवाडा आणि पुणे-बंगळूरू असे आणखी सहा महामार्ग बनवणार आहोत. हे महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहेत”, अशी माहिती गडकरी त्यांनी दिली.

“नागपूर एम्समुळे विदर्भ, मराठवाडा आणि छत्तीसगडच्या नागरिकांना उत्तम वैद्यकीय व्यवस्था मिळणार आहे. याचबरोबर आयआयएम नागपूरमध्ये स्थापन करण्यात आले आहे. त्याची इमारत बघण्यासाठी देशभरातील लोकं येत आहेत. हे दोन्ही प्रकल्प नागपूरमध्ये देऊन पंतप्रधान मोदींनी आपल्यासाठी मोलाचे काम केलं आहे, यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो”, असेही ते म्हणाले.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी ५२० किमीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास केला असून, समृद्धी महामार्गावरून देखील त्यांनी प्रवास केला. यावेळी मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं.

नागपूरकरांसाठी आज ऐतिहासिक दिवस, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार नागपूर मेट्रो फेज-२चं भूमीपूजन

Exit mobile version