spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवशक्ती भीमशक्ती प्रयोगावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

शिवशक्ती आणि भीमशक्ती हा एक राजकीय प्रयोग आहे. सध्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Yashwant Ambedkar) हे या प्रयोगासाठी आणि आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आह. पण आता या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भीमशक्तीला खरी भीमशक्ती मनात नसल्याचे सांगितलं आहे.

नुकतंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवशक्ती भीमशक्ती एकत्रीकरणावर आणि उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले यांनी सांगितले आहे की “शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रीकरण या प्रयोगाची सुरुवात २०११ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) आणि रामदास आठवलें (Ramdas Athawale) यांची भेट झाली होती. तेव्हा ‘शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण गरजेचे आहे.’ असे बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास आठवलेंना सांगितलं असल्याचे आठवले म्हणाले. तसेच बाळासाहेबांनी कधी बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला नव्हता आणि बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे मित्र होते. बाळासाहेब ठाकरेचा बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड प्रेम देखील होते. म्हणूनच शिवशक्ती आणि भीमशक्ती महाराष्ट्रात एकत्र आली पाहिजे. याबद्दल रामदास आठवले यांनी विचार करावा असे बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास आठवले यांना सांगितल असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

रामदास आठवले यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या प्रस्तावावर त्यांनी महाराष्ट्रातील विचारवनतांसोबत , कार्यकर्त्यांसोबत ,आंबेडकर चळवळकरांसोबत जवळ जवळ ७ ते ८ महिने चर्चा केली. सगळ्यांकडून होकार देखील आला. आणि वैचारिक मुद्यांवर मतभेद असले तरी आपला मिशन पूर्णकरण्यासाठी , समाजाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात हरकत नाही. विचारवन्तांकडून असा सल्ला देखील रामदास आठवले यांना देण्यात आला. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत रामदास आठवले यांनी शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग केला असल्याचे आठवले यांनी सांगितलं आहे.

शिवशक्ती आणि भीमशक्ती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. पण प्रकाश आंबेडकरांच्या भीमशक्तीला खरी भीमशक्ती नसून वंचीत शक्ती आहे असे आठवले यांनी सांगितलं. तर खरी भीम शक्ती स्वतःकडे असल्याचा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.

हे ही वाचा : 

Maharashtra News ब्रिटनकडून शिवरायांच्या तलवारीसोबत वाघनखं राज्यात परत येणार

शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीवर दीपक केसरकारांचा टोला

Dr. Babasaheb Ambedkar महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काही प्रेरणादायी उदाहरणे पहा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss