spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही, विनायक राऊतांनी लगावला नारायण राणेंना टोला

२०२४ ला देशात विधानसभा निवडणूक पार पडणार असून या पार्श्वभूमीवर काही सर्वे काढण्यात आले होते. या सर्वेमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला या लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपने माघार घेतली होती पण तेवढ्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे निवडणुक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी “केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही.त्यामुळे दिल्ली सोडून जिल्हा नियोजनाच्या बैठकीला येऊन बसतात.” असे म्हणत नारायण राणे यांना चांगलाच टोला लगावला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते की “३४ मतदारसंघाची यादी पाहिली नाही. पण, कार्यकर्त्यांच्या विश्वासावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा उमेदवारी देतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, नारायण राणे लोकसभा निवडणुकीत उभारले, तर अडीच लाख मतांनी त्यांचा पराभव करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे,” असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केले आहे. यावेळी विनायक राऊत पुढे म्हणाले की “केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे दिल्ली सोडून जिल्हा नियोजनाच्या बैठकीला येऊन बसतात. त्यांच्या खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याला राणेंनी पुन्हा सेवेत घेतलं. त्या अधिकाऱ्याने पदाचा दुरुउपयोग करुन नारायण राणेंच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार केला,” असे म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर आरोप केला केला आहे.

या मुलाखती दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या खात्यातील संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत अधिकाऱ्या संदर्भात म्हणाले की “त्या अधिकाऱ्याने दोन तरुणींची फसवणूक करुन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.” तसे ते पुढे म्हणाले की “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे लवकरच नारायण राणेंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे,” असे म्हणत विनायक राऊतांनी नारायण राणे यांच्या विरोधात मोठा दावा केला आहे.

हे ही वाचा:

जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर आंदोलन … सामनातून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

पुरुषांनी ‘हे’ लुक नक्की ट्राय करून पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss