राज्यातील सत्तांतराप्रमाण आता मुंबई बँकेतही सत्तांतर , आ. प्रवीण दारेकरांची बिनविरोध निवड

राज्यातील सत्तांतराप्रमाण आता मुंबई बँकेतही सत्तांतर , आ. प्रवीण दारेकरांची बिनविरोध निवड

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या हातात असलेली सत्ता आणि राजकारणातील डावपेजामुळे गमावलेले मुंबई बँकेचे अध्यक्षपद भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा स्वतःकडे घेतले आहे. राज्यातील सत्तातंरानंतर मुंबई बँकेतही सत्तापालट होणार अशी चर्चा रंगत होती. मुंबई बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली. तर सिद्दार्थ कांबळे हे उपाध्यक्ष राहणार आहेत.

प्रविण दरेकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवर असलेली सत्ता महाविकास आघाडीने खेचून घेतली होती. राष्ट्रवादी नेते अजित पवारसह शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या वेळच्या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते, त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँगेसच्या सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली होती तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली होती. प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवली असल्याचा शिक्का सहकार विभागाने ठेवला होता. त्यामुळे प्रवीण दरेकर हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते दूर होते.

हेही वाचा : 

दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत केला गौप्यस्पोट, म्हणाले भाजपसोबत युती करण्यासाठी…

प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या साह्याने मजूर असल्याचे दाखवत आणि 1999 पासून ते 2021 पर्यंत मुंबई बँकेच्या संचालक मंडळावर मजूर प्रवर्गातून निवडून येऊन नागरिकांबरोबरच सरकारचीही देखील दरेकरांनी फसवणूक केली, अशा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतु पुन्हा एकदा निवडणूक लढवत दरेकरांनी त्याचा मान मिळवला आहे.

मुंबईतून काँग्रेस आक्रमक, पोलिसांकडून बड्या नेत्यांना अटक

Exit mobile version