उर्फीच्या वादात उडी घेतलेल्या सुषमा अंधारेंवर अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी सोडले बाण

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात जणू काही सोशल मीडिया युद्धच सुरु असल्याचे दिसून येत आहे.

उर्फीच्या वादात उडी घेतलेल्या सुषमा अंधारेंवर अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी सोडले बाण

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात जणू काही सोशल मीडिया युद्धच सुरु असल्याचे दिसून येत आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्या ट्वीटला उर्फीनं प्रत्युत्तर दिलं. पुन्हा मग चित्र वाघ यांनी पोलिसांना पत्र देत तक्रार दाखल केली पुन्हा एकदा उर्फीनं त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आणि यांचा हा वाद आता इतका वाढत चालला आहे कि भाजपा नेत्या चित्रा वाघ या थेट इशारा देत म्हणाल्या आहेत ‘मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडीत मारेन’. त्याच्या या वादात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. परंतु आता सुषमा अंधारेंवर चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत सुषमा आंधरेना चिमटा काढला आहे. त्या ट्विट मध्ये म्हंटल आहे कि, आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो,सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे… तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता,त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं,हा ही धर्म नाही का ? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ? … स्री शिक्षित व्हाही,सक्षम व्हावी,यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का ? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का ? … माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या.. छत्रपतींचा आदर्श,सावित्रीचे संस्कार जपू या.. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या.. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे,ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का?… व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच. समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे. असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे –

सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis),बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Actress Kangana Ranaut) आणि केतकी चितळे (Ketaki Chitale) यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत चित्रा वाघ यांना सवाल विचारला आहे. उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप असेल तर असाच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेणार का? यांनाही तुम्ही मारहाणीची भाषा वापराल का? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे. आणि त्यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट देखील केली आहे.

हे ही वाचा:

Urfi Javed – Chitra Wagh वादात आता फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंची उडी; केले ‘या’ महिलांचे फोटो शेअर

Urfi Javed चे चित्रा वाघ यांना आव्हान, मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version