हलाल मांसावरून कर्नाटकात गदारोळ, कर्नाटक सरकारच्या हलाल मांसविरोधी विधेयकाला काँग्रेसचा विरोध

जेव्हा हिंदुत्ववादी संघटनांनी उगादी उत्सवादरम्यान हलाल मांसावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.

हलाल मांसावरून कर्नाटकात गदारोळ, कर्नाटक सरकारच्या हलाल मांसविरोधी विधेयकाला काँग्रेसचा विरोध

कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. यावेळी सरकार राज्यात हलाल मांसावर (Halal Meat) बंदी घालण्याबाबत विधेयक सभागृहात मांडू शकते. राज्यात हलाल मांसावर (Halal Meat) बंदी घालण्यावरून सभागृहात भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (NCP) जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. FSSAI व्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थेद्वारे अन्न प्रमाणीकरणावर बंदी घालण्याचे विधेयक आणण्यासाठी भाजपचे आमदार एन रविकुमार (N Ravikumar) यांनी पुढाकार घेतला आहे. या वर्षी मार्चमध्ये हलालच्या (Halal) मुद्द्यावरून खळबळ उडाली होती, जेव्हा हिंदुत्ववादी संघटनांनी उगादी उत्सवादरम्यान हलाल मांसावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. भाजपच्या एका गटाला हे विधेयक मंजूर करून त्याला कायदेशीर मान्यता द्यायची आहे.

त्याचवेळी रविकुमार सोमवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांची भेट घेणार आहेत. “काही अनधिकृत संस्था अन्न उत्पादने प्रमाणित करण्यात गुंतलेली आहेत आणि त्यामुळे बेकायदेशीरपणे बाजारपेठेवर नियंत्रण ठेवत आहेत. याला आळा घालण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या विधेयकामुळे या प्रक्रियेला नक्कीच मदत होईल,” असेही ते म्हणाले. ₹या निर्णयावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध सुरू झाले आहे. गेल्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी विधेयकावरून काँग्रेसचा भाजपसोबत जोरदार वाद झाला होता. हिवाळी अधिवेशनातही हलाल मांसाबाबत सभागृहातील वातावरण तापणार आहे.

‘बिल मंजूर न करण्याची विनंती’

सभागृहातील विरोधी पक्षनेते बीके हरिप्रसाद म्हणाले, “हलाल मांसाबाबतचे खासगी विधेयक मंजूर करू नये, अशी विनंती आम्ही सभापतींना करू.” विधानसभेत या विधेयकाला काँग्रेस विरोध करण्यास तयार आहे. काँग्रेस नेते यूटी खादर म्हणाले, “आम्हाला भाजपची रणनीती समजली आहे. ते आपले अपयश, भ्रष्टाचार आणि मतदारांच्या डेटाची चोरी यासारख्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष वळवू इच्छित आहे. या मुद्द्याच्या आधारे त्यांना मतदारांचे ध्रुवीकरण.” कर्नाटक विधानसभेत भाजपने हलाल मांस विरोधी कायदा आणण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राज्यात आणखी एक राजकीय संघर्ष निर्माण होईल.

हे ही वाचा:

Jayant Patil महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता इलॉन मस्कची एन्ट्री?

उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक, हिवाळी अधिवेशनासाठी ठरणार रणनीती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version