spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Urfi Javed – Chitra Wagh वादात आता फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंची उडी; केले ‘या’ महिलांचे फोटो शेअर

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांचा सोशल मीडिया वॉर सुरु असल्याचे दिसून येत आहेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात जणू काही सोशल मीडिया युद्धच सुरु असल्याचे दिसून येत आहेत आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्या ट्वीटला उर्फीनं प्रत्युत्तर दिलं. पुन्हा मग चित्र वाघ यांनी पोलिसांना पत्र देत तक्रार दाखल केली पुन्हा एकदा उर्फीनं त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आणि यांचा हा वाद आता इतका वाढत चालला आहे कि भाजपा नेत्या चित्रा वाघ थेट इशारा देत म्हणाल्या आहेत ‘मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडीत मारेन’ चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी या वादात उडी घेतली आहे. सुषमा अंधारेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो.’ असं या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिलं.

सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis),बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Actress Kangana Ranaut) आणि केतकी चितळे Ketaki Chitale) यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत चित्रा वाघ यांना सवाल विचारला आहे. उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप असेल तर असाच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेणार का? यांनाही तुम्ही मारहाणीची भाषा वापराल का? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे.

सुषमा अंधारेंची पोस्ट –

तसेच या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे आणि त्यात फेसबुक पोस्ट मध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत कि, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.
पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…
अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?
उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.
#सत्तेचा_माज #arrogance

अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. आता हा मुद्दा अजून किती चिघळणार खे तर येणारा काळच ठरवेल.

हे ही वाचा:

Urfi Javed चे चित्रा वाघ यांना आव्हान, मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss