उर्फीचा वाद पेटला, चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाची थेट कारवाई

उर्फीचा वाद पेटला, चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाची थेट कारवाई

काही दिवसांपासून उर्फीच्या कपड्यांवरून महाराष्ट्रात राजकारण चांगलाच तापल्याच दिसून येत आहे. उर्फीच्या कपड्यानावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) व महिला आयोगाला कारवाईची (Women’s Commission) मागणी केली होती. तर काल चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. आज महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. नोटीसमध्ये महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्याचं आव्हान चित्रा वाघ यांना करण्यात आले आहे. तर १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटीस पाठवली असून खुलासा सादर करावा. अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेतला जाईल.

पुढे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं, कारवाई करायची, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार आहे. गुरुवारी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली, महिला आयोगानं तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit ) हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आलेय.

चित्रा वाघ यांना इशारा देत भारतीय संविधानानं व्यक्तीस्वातंत्र्य दिलं आहे. उर्फी जावेदचं समर्थन कोणी करावं हे त्यांनी आम्हाला सांगायचं गरज नाही. चित्रा वाघ या काही काळ आयोगाच्या सदस्या होत्या, त्यामुळे अध्यक्ष कसा निवडला जातो याचा अभ्यास त्यांचा कमी पडला.त्यामुळे अशा विषयात वेळ वाया घालवणं गरजेचं नाही, मास्टर माईंड कोण याबाबत त्या नेहमी बोलतात पण रघुनाथ कुचिक प्रकरणात त्या तोंडावर पडल्या, संजय राठोड प्रकरणात तोंडावर पडल्या अशी टीका यावेळी रुपाली चाकणकर यांनी केली.

हे ही वाचा:

आई वडिलांच्या नावाला काळिमा, सख्या बापाने केला लैंगिक अत्याचार

टीना दत्ता आणि शालीन भानोतच्या रिलेशनशिपमध्ये सलमान खानची एंट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version